लहान मुले Poem by Bhagyashree Gunjikar (Naik)

लहान मुले

पानावरील दव वाटत असे लहान मूल
जणू पानाने कुशीत घेतले सुंदर फूल.....
हया सुंदर फुलाला हे जग उमगेना
कधी कुठल्या पानावर हे स्थिर बसेना.....
कधी घेतली ऊंच झेप अवाढव्य आकाशातून तर कधी मारली ऊंच भरारी पानाच्या मिठीतून..... वडील धारी निसर्गाचे नियम नाही पाळायचे मग भूमीवर पडल्यावर का महणून रडायचे.....
त्याच प्रमाणे असते लहान मुलांचे जीवन इकडेतिकडे खिदळत असत नको तिथे काहीतरी बडबडत बसत.....
कधी कशाची भीती भासत नसते ह्यांना जणू सर्व जग पाहिले आहे एव्हाना.....
मोठमोठय़ांचे बोलणे आयकायचे नसते ह्यांना.....
अम्हाला माहीत आहे, आम्ही मोठे झालो आहे हे बोलत बसतात सर्वांना.....
पण खरेच का काही माहिती आहे ह्या चिमुकल्यांना की उगाच फेकत बसतात छोट्या-मोठ्या गप्पांना.....
ह्यांना पाहता वाटते बर्‍याच मोठयांना परत एकदा लहान होता येईल का अम्हाला.....

Sunday, September 13, 2015
Topic(s) of this poem: love,nature
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success