वाट पाहते मी त्या क्षणाची Poem by Bhagyashree Gunjikar (Naik)

वाट पाहते मी त्या क्षणाची

वाट पाहते मी त्या क्षणाची
कधी मनुष्य समजेल व्यथा हया निसर्गाची...
स्वताच्या स्वार्थासाठी गेला निसर्गा विरोधी अता भोग जे काय आलय तूझ्या समोरी...
जरी महाशयांनी शिकवले होते जगाच्या उद्धाराचे तरी नाही केला विचार काही तरी सूधारण्याचे...
वाट पाहते मी त्या क्षणाची
कधी मनुष्य समजेल व्यथा हया निसर्गाची

बनवतच गेला मोठमोठ्या ईमारती
कधी डोंगर तर कधी झाडे-राने तोडीशी...
नाही विचार केला मुक्या पक्षी-प्राण्यांचा अता घे अनुभव त्यांनी तूझ्या घरात घुसण्याचा...
वाट पाहते मी त्या क्षणाची
कधी मनुष्य समजेल व्यथा हया निसर्गाची

बनवतच गेला धूरेदार मोटारी एका मागोमाग एक प्रदूषण वाढवी, कोंदट केली ही दूनिया सारी... तरी समाधानी नाही झाला तू एवढयावरही....
बनवतच राहशील तू स्वतःसाठी साधने जरी देवाने येऊन चक्क तूला जरी विनवीले...
हाच तर आहे माणसाचा स्वभाव स्वतःच्या पायावर मारून घ्याचे कूराड...
जर का हा तू केला असता विचार तर देवच बनला असता सदाचार...
वाट पाहते मी त्या क्षणाची
कधी मनुष्य समजेल व्यथा हया निसर्गाची

Monday, September 14, 2015
Topic(s) of this poem: lifestyle
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success