मृत्यू... अजोड, दुरावलेल्या स्वभावाचा Poem by Shubh Salunkhe

मृत्यू... अजोड, दुरावलेल्या स्वभावाचा

पूर्वी जवळचेदेखील नव्हते कोणी पण

आज परकेसुद्धा जवळ आले...

खरचटल्यावरही ना विचारे कोणी

आज प्राण द्यायला उदार झाले...

पूर्वी सोबत ना चाले कोणी

मला घेऊन जायला ते हजर झाले...

दिसलो तरी ना पाहिले कोणी

आज पाहण्यासाठी आतुरलेले...

बोललो तरी ना ऐकले कोणी

आज बोलायला ते आसुसलेले...

जसे जवळ नव्हते कोणी

परकेही तसेच दुरावलेले...

जवळ असूनही ना जाणले कोणी

माझ्या दुराव्याने ते मोडलेले...

म्हणून सख्या रे जग रे सुखाने

जगतील तेव्हाच आयुष्याने कंटाळलेले...

तेव्हा समजते मनाला की,

जगण्याने छळले होते, मरणाने सुटका झाली

अन्

येण्याचे महत्व कळले होते पण,

जाण्याने सुटका झाली...!

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success