सूर्यास्त Poem by Shubh Salunkhe

सूर्यास्त

सूर्यास्त...

जगाचा, जीवनाचा की दिवसाचा?

पारदर्शी...

जीवन, जग की मी?

जीवनाकडे पाहतो तेव्हा क्षणभंगूर मला ते वाटे

अचानक मन गहिवरते की तोडावे ते नाते?

जगाकडे पाहतो तेव्हा खोटे मला ते वाटे

सत्य शोधावे तेव्हा दुःख उरातून दाटे

दिवसाकडे पाहतो तेव्हा भ्रमिष्ट मला ते वाटे

जसे वाटेमध्ये गुलाब पण अंगावरती काटे

का बरे असे होते अन् कसे विपरित घडते

अत्यंतिक शेवट होतो माझा नाव ते मागे उरते...!

- शुभम साळुंखे, धुळे
<photo id='1' />

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success