जीवनगाणे Poem by Rajeev Deshpande

जीवनगाणे

जीवन सुखवूनी जाते
कुरवाळूनी तूला मला ते
अलवार गीत गाते......

बेताल जीवनात या
निसटता जरी वसंत
शिशिरास आवडीने
केले तरी पसंत

मोकळा श्वास घ्याया
नियती बघतसे अंत
हसण्यास जीवना या
लाभतसे तरी उसंत

अस्थैर्य सतत संगतीला
नव्हती तरीही खंत
लटकेचि रुसलो जरी
होते अडथळे अनंत

जगणे जरी अधांतरी
होती उद्याची भ्रांत
जपण्यास छंद वेडे
चोरीला हळूच निवांत!

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success