Lost Love 2 Poem by mayur jadhav

Lost Love 2

तु बोलुन मोकळी झालीस
की विसरुन जा मला
पण मी काय करु
विसरताच येत नाहीना मला
तुझ्यासाठी सहज सोप असेल ग
सार काही विसरुन जाणं
पुन्हा नव्याने सुरुवात करणं
अन पुढे चालायला लागणं
पण माझ तस नाहीये ग
मी अजुनही आठवणींवर जगतोय
झाल्या गेल्या भेटींनी साठवतोय
कधी हसतोय कधी रडतोय
आठवण्याशिवाय एक तुला
काहीच सुचत नाही मला
आता तुच सांग ग मला
कसा विसरुन जाउ तुला

Thursday, April 20, 2017
Topic(s) of this poem: marathi
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success