रामराज्याची पहाट Poem by Rajeev Deshpande

रामराज्याची पहाट

भिती गेली, क्षती गेली, भयासुरी आपत्ती गेली ।
गती आली, मती आली, गत सुबत्ता हाती आली ।।

नशा गेली, दशा गेली, काळीभोर निराशा गेली ।
दया आली, माया आली, रयतेला रया आली ।।

इडा गेली, पिडा गेली, तडीपार दैना गेली ।
रिद्धी आली, सिद्धी आली, ऐश्वर्याला वृद्धी आली ।।

घाई गेली, चाई गेली, काळी रोगराई गेली ।
श्रीमंती आली, कांती आली, सर्व सुखशांती आली ।।

व्याधी गेली, व्यथा गेली, नैराश्येची बाधा गेली ।
भाग्यलक्ष्मी दारी आली, मनाला उभारी आली ।।

चीड गेली, भीड गेली, जगण्यावरची कीड गेली ।
हाक आली, जाग आली, रामराज्याची पहाट आली ।।

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success