मुम्बै दिनांक: - रिपीट / टेलीकास्ट /... Poem by Sachin Thakur

मुम्बै दिनांक: - रिपीट / टेलीकास्ट /...

स्थलांतरित झाल्यापासून
स्थिरतेचे गाणे गाताच आले नाही...
वाहनांच्या पार्श्वसंगीतात सुरु होणारा
आणि इमारतीनी बहरलेल्या आकाशात
आपल्यासाठी एक जागा शोधणाऱ्या
डोळ्यात मिटणारा दिवस...
पायांची लय विस्कटून टाकणारा रस्ता,
आणि लक्षात न राहणारी चेहररयाची रहदारी....
रात्री-झोपताना-सकाळी-संध्याकाळी-वेळी-अवेळी
आठवतो तुझा चेहरा त्याच्या प्रश्नासकट-``सगळ काहि ठीक असताना पायाची भिंगरी झाल्याची स्वप्न तुला का पडतात..? ''
माझ तुला उत्तर भिंगरी सारख....
पण कधीतरी मी थकेन
तेव्हा परत येवून फक्त एकदाच
तुझ्या कुशीत मनसोक्त
झोपेन म्हणतो..........................................! ! !


मुम्बै दिनांक: - रिपीट / टेलीकास्ट /...

...सशाठाकुर

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success