फुलपाखरु... Poem by Lyrics Swapnild Chatge

फुलपाखरु...

'फुलपाखरु'

रात्र सरली, पहाट आली
हिरव्या पाणावर,
दवबिदु ही सजली..
कोवळ्या किरणात
ही शोभुन दिसली..
अशी ती कोमल कळी....! !
भरकटली जरा बावरी,
स्वत: ला ना सावरी..
दाखवत मोहचा रंग,
सर्वत्र पळत सुटली...
अशी ती रंग बावरी....! !
भरुनी उरी या,
प्रेमाचा नवा गंध..
वाटते आता मला,
उडावे त्याच्या संग...
अशी ती जरा चावरी...!
©स्वप्निल चटगे.

Wednesday, March 12, 2014
Topic(s) of this poem: Nature
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success