॥ ग्रीष्म ॥ Poem by Rajeev Deshpande

॥ ग्रीष्म ॥

घेई माघार ऋतु वसंत
बदलता सृष्टीची लहर
ताबा घेई ग्रीष्म ऋतु
कडक उन्हाचा कहर

भर दिवसा सुस्तावते
खेडे गाव आणि शहर
कोपला भास्कर सोडी
तप्त किरणांचे जहर

विसावती गुरे वासरे
होता मध्यांनाचा प्रहर
होतो शांत चिवचिवाट
पसरता झावेची लहर

होते काहिली जीवाची
गळे उत्साहाचा मोहर
होतो नटखट गोपाळ
विरक्त उदास शिवहर

तशात सुखवी जीवाला
वाळ्याचा गंध मनोहर
झुळझुळ वात पहाटेचा
अन् गुलमोहराचा बहर!
*****
~ राजीव निळकंठ देशपांडे

॥ ग्रीष्म ॥
Sunday, June 1, 2014
Topic(s) of this poem: Nature
POET'S NOTES ABOUT THE POEM
This poem describes harsh summer with pleasant morning in India.
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success