॥ प्रयास ॥ Poem by Rajeev Deshpande

॥ प्रयास ॥

आयुष्याशी खेळता खेळता
हाताला चटके लागले
तोंड फिरवून गेले आपले
परके चांगले वागले

जगरहाटीत ठेचकळतांना
भान कर्तव्यांचे राखले
विरोधकांनी खजील होऊन
दिले उत्तम गुणांचे दाखले

नशिबाशी झगडत झगडत
नाव कमावले चांगले
पाठ थोपटण्याची येता वेळ
जवळचे दूर पांगले

चेहरे सुकले परिस्थितीने
धुळीने पाय माखले
टक्के टोणपे खात खात
माय बापाचे नाव राखले!

~ राजीव निळकंठ देशपांडे

Friday, June 6, 2014
Topic(s) of this poem: life
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success