मातीत स्वप्न माझे रुजवित चाललो
शाबित स्वप्न माझे रिझवित चाललो
येथे महाल माझे मातीत कोरलेले
काळ्या निळ्या ढगांना उडवित चाललो
रंगात रंग लेवुन साकारले तिला मी
मन छप्पराविनाही बुजवित चाललो
खोपा मी रेशमाचा आकारला करांनी
त्या पेटत्या दिलाना विझवित चाललो
पुल बाधुनी मनाचे भरली मी पोकळी
प्रीत भंगल्या उरानी जुळवित चाललो
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem
lovely dream keep it up...thank you