हलके हलके धुदंलेले क्षण सारे,
वाटले कोर्या कागदावर उतरावे...
चिबं चिबं न्हाहून शब्दात पुन्हा;
'कविता ही प्रेमाची' मी करावे...
दरवळला पारिजातक हा पहाटे,
अलवार तुझ्या कोमल स्पर्शाने...
तशी तू हलके शब्दास स्पर्शावे;
अन् 'कविता ही प्रेमाची' मी करावे...
दाटले आभाळ सारे धुदं आठवाच्या क्षणाने,
भिजावे पावसात 'तू अन मी'अन् चिबं आपूले मन सारे...
तशी तू हलकी सर होवून कवितास प्रेयमय करावे;
अन् 'कविता ही प्रेमाची'मी करावे...
धुदं झाले आज सारे हे रुपेरी गंध वारे,
स्पर्श हे वाटे नवे वाटे नवे स्पदंन सारे...
तशी तू हलके हलके ओठावर मोहरावे;
अन् 'कविता ही प्रेमाची' मी करावे...! !
© कु.स्वप्नील चटगे (अबोल मी)
दि.18.12.2014
www.aishwswapn143.blogspot.com
- - - - - - - - - - - - - - - -
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem