मी ही जाणून आहे प्रेम तुझं,
तरीही अबोल आहे मी जरा
वाटलं कधीतरी कळेल तूला
नजरेतील ह्या अबोल इशारा
ते तूझे चोरुन चोरुन पाहणे,
मनास होते किती भावतं
वाटे जणू धूदं साजंसकाळी
दवावरती वेडे मन नाचतं...
आजूनही हवेहवेसे वाटते,
ते तुझे मधाळ बोलणे...
परी होवून मार्दव मी शब्द,
ओठावरती असेच मोहरावे
कातिलवानी नजर हीतुझी,
नजरेस माझ्या वार केली
कळलेच नाही कधी कसे,
काळजात तू वास केली
© स्वप्नील चटगे.
(अबोल मी)
दि.30.11.2014
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem