छोटी शहरे व नदी Poem by Sameer Khasnis

छोटी शहरे व नदी

छोटी शहरे व नदी

छोटी शहरे सदैव स्मरण करी मला मृत्युची

माझं जन्मगाव पहुडले निमुटपणे सभोवताली

वृक्षतरु समवेत

जे सदोदित असतं जसं आहे तसं

उन्हाळा असो वा हिवाळा

कधी धुळ उडवत असुळविसुळ


वा कधी वारें खिदळत खोरें वेगाने

अलिकडे कोणी तरी निधन पावले

विषण्ण निःशब्द आम्ही केला विलाप

पाहून कुसुम हे निरागस विमनस्क स्थिती


निशिगंधाची

जीवन व मुत्यु, जीवन व मुत्यु

कर्मकाण्ड शाश्वत जैसे तेवढे

चेतनायुक्त सरिता ही

उष्म उन्हाळा चिरत धरणी

करी एकधोरणी प्रवाह तिची व्यथा

कधीतरी, कधीतरी

चिंतन माझे करी व्यक्त टाकत ती सुस्कारा

कथित लालसा मत्स्य व ज्योत्स्ना

आहे निश्चित ह्या सरितेचा अंतरात्मा

अवगत आहे तिला, पसरली घालून वेसण ह्या

छोट्या शहराला,

वर्षावूष्टी चा पहिला टिपूस ते कोरडी पृथ्वी प्रवास

आणि धुके दाट पर्वतश्रेणी ची वाट
अवगत हे सरितेसी
अनश्वर हे उदक

पवित्र स्थानांचे चित्ताकर्षक चित्र हे

गुणग्राहकता करी बाल्यावस्थेतील


ही छोटी शहरे निरंतर. तणावग्रस्त


भविष्यकाळाविषयी


दिवंगत आहेत दफन पश्चिम दिशेने


जागृत जेव्हा होई अंतरात्मा


पादाक्रांत करील सोनेरी पूर्व दिशा
होत दाखल भास्कर सदनी

असुन शीतल वेळू
पुनर्संचयित होत सुर्य किरणांनी

प्राधान्य देत आयुष्याला, असं काहीसं

ह्या छोट्या शहरांमध्ये ‌जी वसलेले नदी लागत

आम्हा सर्वांना चालणं आहे, प्रभू समवेत

मुळ कविता: Small Towns and the River by
Mamang Dai,12 th Std English Language textbook.
रुपांतर: समीर खासनीस

छोटी शहरे व नदी
POET'S NOTES ABOUT THE POEM
This poem by Mamang Dai is from Arunachal Pradesh, the winner of the elite Sahitya Akademi Award for her work in literature, especially poetry. This is subtle and a little subjective in mood. It happens at times when young students find it a little complex structure. With this thought in mind, I went for a Marathi translation that could be very convenient for students to understand.
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success