Activities of Chaitanya Kanherikar

कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. घेतले रानफुलास उचलून रान वाटेवरी चालताना lनसे त्यास गंध रूप जरी अंगभर काटे असताना l अनेक रानफुले जरी वाटेवरी होती कळवळा मज त्याच फुलाचा का आला l नकळत पडला पाय कुणाचा मृदु पराग कुस्करला l कण्हत असावे फुल जरी हे अज्ञाती हुंदका उमटला l परडीत ठेवले त्यासी उचलून l सुखावले फुल परडीच्या पिंजऱ्यात आतून l पण होता स्वच्छंद त्या वाटेवरती आणि रानाचा सहवास l परडीत होती घुसमट आणि एकांत कारावास l मुक्त जिवाचा आनंदच न्यारा l आता ते हिरमुसले जीव कावरा बावरा l वाटेवरल्या फुलांस वाटे हेवा या फुलाचा l आम्हास ना कोणी उचलून घेती व्यर्थ आलो जन्मी रानफुलाच्या l परडी तले फुल रुसले मजवरी, का उचलून घेतले तू मजला l होतो सुखात वाटेवरी त्या नेऊन सोड मजला l खरंच चुकलो का मी देऊनी यास जीवनदान l वाटेवरी वाट पाहे त्याची वृक्ष वेली फुल पानं पान l त्या वाटेवरी त्याच ठिकाणी सोडले मी त्यास l मागे वळूनी न पाहता निघालो सोडुनी माया मोह पाश l रान वाटेवरी कितीदा विव्हळ्ती रानफुले. तिथेच सुखाचे जीवन त्यांचे मनास समजावीले l क्षणभंगुर जीवन त्यांचे दिस भरात कोमजते l आस जीवाला लावूनी जाते मन का हुरहुरते l. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दि.९जुलै२५
...
09 Jul, 07:13
कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. अवचित्य महिला दिनाचे साधून का उधळीत मुक्ता फळे l. स्त्री स्वातंत्र्य मुक्ती आरक्षण संरक्षणाची खोटी मृगजळे llध्रुll. जरी झेप घेसी चंद्र मंगळावरी l कुठे जाळीती तुझा आरोप करून बंद दारी l. देवदासी कधी तू देवाची मुरळे ll१ll. अजुनी बुरख्यात लपविसी देह चंद्र मुख तुझे l किती सहशील अत्याचार दडपणाचे ओझे l तलाक त्रिवार बोलून उखडतील तुजला समजून बांडगुळे ll२ll. शल्यचिकित्सा जरी करसी देऊनी एनएसथेटेशिया भूल l. खेडोपाडी नासुटते तुज अजुनी चूल नी मूल l. अजूनही गांजलेले तू मागासलेली खुळेll ३ll. असंतुलित स्त्री-पुरुष जन्म मृत्यू-दर उपजते l वैरीण होते माय तुझी तुझ जन्मा आधी मारते l अजून निष्पाप असाह्य तू पुरुषी वर्चस्वामुळे ll४ll. टपली गिधाडे सभोवती नजरा चघळून पाहे l किती लाचार अगतिक तू जरी झगडू पाहे l. अजूनही होतो सौदा तुझा लावून बोली बाळे.ll५ll. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दिनांक: १३मार्च२०१२
...
22 Jun, 05:02
कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. ऊन पावसाचा रितू सखी श्रावणी सजतु l. फुल पानावर मोती पोळ्याचे पाचू l. पंख फुलोनि पिसारा मोर लागलाग नाचूll ध्रु ll अंबरी उठली सात रंगांची कमान l. कवडसा केवड्याचे बनी रुते बाण l. ओढणी रुपेरी श्रावणीस लागे काचू ll१ll. ऊन पावसाचा खेळ संगे वारा अवखळ l. नभ मंडपी गुंफली पाखरांची माळ l. ओल्या तुषारांचे पाचू आले साचू किती वेचू ll२ll. डोंगर गाली निळे आसू ओघळले l. जिरता जल हासली रानफुले l. काळ्या भांगात कुंकवाची लकेर खेचू ll३ll. फुलातुनी उडे काळा लबाड भवर l. पाठ शिवणीच्या खेळी फुल पाखरे बेजार l. गुं गुं गाणे गुणगुणी मधु गेलाग रीचू ll४ll कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दिनांक २०जुलै२००९.
...
21 Jun, 06:51
कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. एक शुभ्र चांदणी ढगाळ लपली ०००. चाणाक्ष नजरेनं तिला क्षणात हेरली ०००. मनानं तर घेतला होता तिचाच ध्यास ०००. स्वप्नातील स्वप्न असाव ०००. पण होतं ते वास्तव ते ०००. दिवस रात्रीची रात्रीची अनेक वळणे ०००. अन अचानक जाग आली ०००. पहाट होती वसंतातली ०००. ती आली होती जणू परीच्या पावलांनी ०००. अंगणात उतरली हाताच्या आधारानि ०००. मखमली तिच्या हाताचा स्पर्श ०००. रोमरोमातून जागला प्रीतीचा प्रणइ हर्ष०००. असा कितीतरी वेळ ००हाती होता हात ०००. शब्द होते मुके ००काळ होता शून्य ००. आवाज न काही ००. रात्र संपता संपता क्षितिजावर पहाट झाली ०००. नाजूक साजूक चांदण्या सर्व मावळल्या ०००. शुभ्र चांदणी उरली ०००. आणि पाहता पाहता तीही निघाली ००. हळुवार हात सोडवून पुढे ढगात जातच राहिली ०००. मधूनच पाही वळून मोठ्या पांडूरक्या ढगाच्या आडून ०००. वळणा वळणात झाली दिसेनाशी ००. हृदय माझं घेऊन गेली स्वतः पाशी ००. दिवस रात्रीची उरली आहेत वळणे ०००. क्षितिजा पर्यंत ००. प्रतीक्षा करत आहे आजही मी०००. करत राहीन ०००.जीवात जीव आहे तो पर्यंत०००. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दिनांक २० एप्रिल २००२.
...
19 Jun, 11:44
Close
Error Success