मेघांचा गडगडता नारा
धरतीवर पर्जन्य धारा
सैरावैरा सुसाट वारा
छतांवर तडातड गारा
पावसाचा पिसाट मारा
क्षितीजाचा सांज तारा
नभमंडपी राशी बारा
सागरतिरी वात खारा
वैशाखाचा चढता पारा
कुरणावर हिरवा चारा
शकुनाचे तोरण दारा
नैराश्याला नाही थारा
निसर्गाचा पसारा सारा!
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem