॥ वृक्ष ॥ Poem by Rajeev Deshpande

॥ वृक्ष ॥

लक्ष लक्ष पर्णचक्षूंनी, लक्ष वेधिती वृक्ष
विना वृक्ष भवताल, भासतो भकास रुक्ष॥
रक्षिण्या पर्यावरण, वृक्ष सदोदित दक्ष
विशुद्ध ठेविती हवा, करूनी धुलिका भक्ष॥
नक्षिकाम लतिकांचे, भार वाहती वृक्ष
प्रेमिकांच्या भेटींची, वृक्षची देती साक्ष॥
वाटसरूंचा विसावा, शाळा पक्षांची वृक्ष
दाट सावली गुरांना, सेवाभाव तो नि: पक्ष॥
कत्तल का वृक्षांची? हा प्रश्नचि असे यक्ष
ज्याला देणेचि ठाऊक, कर्ण भूमंडळीचा वृक्ष॥
येता श्रावणाचे पर्व, वाहती बेलपत्र लक्ष
देऊनी पर्णिका पवित्र, मोक्ष मिळविती वृक्ष॥

Friday, February 3, 2017
Topic(s) of this poem: nature
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success