हेच आहे जीवन Poem by mayur jadhav

हेच आहे जीवन

प्रेम सखीवर करावे..
बहिणीच्या राखीवर करावे..!
आईच्या मायेवर करावे..
बापाच्या छायेवर करावे..!
प्रेम पुत्रावर करावे..
जमल्यास,
दिलदार शत्रूवर हि करावे..!
प्रेम मातीवर करावे..
निधड्या छातीवर करावे..!
शिवबाच्या बाण्यावर...
लताच्या गाण्यावर प्रेम..
सचिन च्या खेळावर आणि
वारकर्यांच्या टाळावर हि करावे!
प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे..
प्रेम गणपतीच्या मस्तकावर
हि करावे..! !
महाराष्ट्राबरोबरच..
देशावर...
आणि,
अगदी..
न चुकता
स्वतःवर...
स्वतःच्या कुटुंबियांवर
प्रेम करावे.! ! ! ! ! !
हेच जीवन आहे

Thursday, April 20, 2017
Topic(s) of this poem: marathi
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success