शाप आहे Poem by dhirajkumar taksande

शाप आहे

Rating: 5.0

नको बनु तु सावली; माणसाच्या प्रतीमेची,
नको बनु तु माऊली; देवताच्या प्रतीमेची.
नको तुझे अपहरण; पुरे अग्ऩीपरीक्षा,
इतिहास नव्याने घडव आता
विस्तार तुझ्या ज्ञानाच्या कक्षा.
तुच तु सर्वांच्या ठायीं; जाण घे तुझ्याअस्मितेची,
हो मित्र; पतीची, जसी सावित्री ज्योतीची.
*********************************
देशात ह्या जन्मल्याचे मी; भोगते पाप आहे,
जन्मास स्त्री जीवाला; कसला हा शाप आहे.||१||
***
मनाई हुकूम आहे; विहरण्यास माझ्या,
उंबरठ्यात दंशनारे इतुके; धर्मांध साप आहे.||२||
***
घेता न येतसे आईला; येथे श्वास मोकळा स्त्री भ्रुणाचा गळा घोटणारा; ईथे बाप आहे.||३||
***
असुनी समानता; नाही अजुनी,
रक्त नात्यातही स्त्रीयांसाठी; वेगळे माप आहे.||४||
***
जित्या जन्मदायीनीस; वागणुक खेटराची,
अन् देवीदेवतांचा किती रे; होत जाप आहे.||५||
***
समाजाने जीवित माझे; बांधले दावनीला,
दास्य भोग माथी माझ्या कलंक छाप आहे.||६||
***
अंकुरास फुलदाणीच्या; सूर्य साथ नाही,
पुरुषी वर्चस्वाची; माझ्या उरी टाप आहे.||७||
***
सारे कष्ट व्यर्थ; कोंडमारा जीवाचा,
सदोदीत मजला; मिळते ईथे थाप आहे.||८||
***
मन मर्जी सारी तुमची, सर्व काही तुमचे,
मर्जी नाही माझी कसली; तरी चाप आहे.||९||
***
जरी नाही वदले मजला; वंदे मांतरम्,
तरी भुवनाला तुमच्या; दरी साफ आहे.||१०||

Sunday, September 7, 2014
Topic(s) of this poem: women
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success