कुंपने शेतं चराया लागले Poem by dhirajkumar taksande

कुंपने शेतं चराया लागले

डोळस, हातात काठी धराया लागले
कुंपने, शेतं बिनधास्त चराया लागले

जप करी मासे बगळ्यांच्या सत्संगी
ठगांच्या बाजारी, वेडे मराया लागले

जीवन खपले जपता ठसे पावलांचे
माणसे आता, सावली धराया लागले

कुणासाठी केली कुणी ही वानरसेना
सेवा स्वत: चीच सेवक कराया लागले

नेते धनवान, भासे पामरांसाठी महान
खीसे कापून झोळी ते भराया लागले

पुजती लोक इथे पाजून दूध नागांना
बीळ आयते बघून ते रहाया लागले

काळीजासाठी ढोंगी बसती उपोषणा
आसवे मगरांचे तेव्हा झराया लागल

Wednesday, January 7, 2015
Topic(s) of this poem: human condition
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success