आठव तो पाऊस, आठव तो प्रवास
त्या पावसात आपणं दोघे चिंब झालो होतो
आठवतय, त्या प्रवासात आपलं हितगुज साधलं होतं
तू ही आली होतीस नखशिखांत भिजून
उदास भकास आसंमतात नवी बहार घेवून
आठवतय तो पाऊस, आठवतय तो प्रवास
होय, तोच पाऊस ज्यानं आपल्याला आडोशाला थांबवलं होतं
तोच पाऊस ज्यानं आपलं मिलन घडवून दिलं होतं
आपल्याशी त्याचं खुपसं देणं आहे
म्हणूनच त्याला आठवणं आपलं कर्तव्य आहे
कधी नाही पण तेव्हा मात्र तो
ओतल्यासारखा बरसत होता
कधी नाही पण तेव्हा मात्र
वारा तुफान वाहत होता
त्या पावसात सारं जनजीवन विस्कळीत पडलं होतं
त्या पावसात वाटेवरती पाणी तुडूबं भरलं होतं
आठवतंय तो भयंकर ताडवं माजवणारा पाऊस
आठवतंय आपलं सौम्य संवाद साधणारा पाऊस
तोच पाऊस जो इतरांना घातकी वाटत होता
पण आपुली मात्र जवळीक साधत होता
आठव तो पाऊस, आठव तो प्रवास
त्या पावसात तू क्षणांक्षणाला भयभीत होत होतीस
विज चमकत होती भितीने तू माझ्या मिठीत येत होतीस
कुणास ठाऊक आता सगळं तुला आठवेल की नाही
पण मला मात्र आता प्रत्येक पाऊस तुझी आठवण करुन देतो असतो
अशा प्रवासात मग तुझाच मला भास होत असतो
इतका हरवुन जातो..इतका हरवुन जातो कि
कळतच नाही पाऊस कधी निघुन जातो ते
अखेरीस डोळ्यांच्या कडांभोवती फक्त आठवणींचा ओलावा राहतो
.- अमित
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem