कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. जलाशयामध्ये हंस विहरती आम्र तरु सभोवतीl. रेशीम रश्मी उधळीत आला तोच सूर्य प्राती llध्रुll. कुहू कुहू विरली कोकीळ वाणी l. झुळूक समीर पसरवित तरंग पाणी l. सुरात तिचा सूर मिळेल एक सुरी गाती ll१ll. तरुचे हे फिरता बन दिसे दूर धावे l. जिथे पहावे तूच हासता मन हे विसावे l. तूच हवी लावायला मनी सांजवाती ll२ll. रान सारे फिरलो अजूनही आस वाटे l. एक तुझे स्मित स्मरता स्वर्ग दोन बोटे l. आज रात मिलनाची दोन जीवे प्रीती ll३ll. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दिनांक१८ ऑक्टोबर ८६.
...
Read full text