कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. गंध तुझा दूर दरवळे तीच तू उमलती कळी l. लपाछपी ही कशास आता कशी सहु तुजविण दुरी l. रात्रीचे हे टिपूर चांदणे, चांदण्यात या तुझे भासणे l. मिटता डोळे स्वप्न जागवी तूच होऊन परी l. स्मित तू ओठी लपविता प्रयास होईल मनावरता l. लपूनी पाहसी माझे हे झुरणे हौस तू केली पुरी l. तव भेटीची आस लागली मध्यरात् पाहता उलटली l. रात्र राणी गंधात लोपली भातुकलीची हाऊस खरी l. कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दिनांक: २५ डिसेंबर ८६
...
Read full text