जन्म हा थोडा चुकल्यासारखा वाटतो
गणगोत इथला परकाच वाटतो
लाचार हे आयुष्य बेकार मज वाटतो
कण्हत रोज जगणे आता नको वाटतो
मी चाललोय प्रवासी तो रस्ताच चुकीचा होता
मुक्काम जे लाभले तो गाव अनोळखी वाटतो
आधार मी शोधला ते घर बंदिस्त होते
अंधारात मी एकला छप्पर अपुरा वाटतो
अस्वस्थ या वाटा अन मी मुसाफीर नवखा
भेटला जो सोबती तो हि घातकी वाटतो
आयुष्य माझे मला शत्रु समान झाले
आयुष्य वाटताना देव चुकला वाटतो
- अमित अंजर्लेकर
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem