बाहेर असा पाऊस ओथंबुन वाहत असताना
मी एकांताने ग्रासलेल्या घराच्या खिडकीपाशी..
असा एकसंथ उभा असणं सहाजिकच आहे,
तशी माझी हि जुनीच सवय आहे
तरि प्रत्येक पाऊस हा माझ्यासाठी नव्याने बरसत असतो
आणि नकळतच माझ्यापासुन मलाच हिरावुन घेत असतो
त्याचं माझं नात काय असावं कुणास ठाऊक?
पण तिझ्या माझ्यातलं अंतर थोडं दूर सारत असतो एवढं मात्र नक्की..
आता इथं सगळं शातं असताना
आणि घराच्या पागोळ्यां अशा ओघळत असताना
तू हि तूझ्या आठ मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गैलरीपाशी
स्तब्ध होवुन उभी असशील
जसा मी इथे उभा आहे अगदी तसंच..
तुझ्या भोवताली सुध्दा जुन्या काळाची सावट पुन्हा नव्याने पसरली असेल
जशी इथं पसरलीय ना अगदी तसंच
तू शुन्यात जाऊन पाहत
फक्त आभाळाचं काळवडणं, गर्जणं अन मनसोक्त बरसणं
मी हि निरखुन पाहतोय एक एक आभाळ
आणि पाऊस नुसता नितळत राहतोय मनातून गात्रागात्रातून...
किती सुंदर असतं ना...!
पावसाचं निर्धास्त पणे बरसणं
कुठलं हि बंधन न ठेवता हवं तेव्हा हवं तेवढं बरसता येतं त्याला
आपण मात्र पाळत राहतो बधंने जातीपातीची, गरिबश्रीमंतीची, असल्या नसल्याची, आमक्या तमक्याची.,
पाऊस सगळ्यांचीच ओजंळ समानतेने भरतो
अन रिती हि करतो
कित्येक काळ कोरडे राहिलेले किनारे चिंब भिजवुन टाकतो
तसंच काहीस तुझं ही झालं असेल
सावर स्वत: ला आणि
मिटलेले डोळे उघड आता पागोळ्यांची टप टप सुरु झालीय
बाहेरचा पाऊस कोरडा झाला आहे
पागोळ्यांपाशी धरलेला हात पहा
कित्येक थेंब निसटुन गेलेत तळहातांवरुन, काळाच्या ओघात
राहिला तो फक्त ओलावा
- अमित आंजर्लेकर
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem