Our Relation Poem by mayur jadhav

Our Relation

Rating: 5.0

असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया;
आहोत ना एकमेकांसाठी खास
मग एकमेकांना घाव नको देऊया!
द्यायचंच असेल तर देऊ ओठांवर हसू,
कधी उदास असू, तर खुदकन हसता येईल
हृदयामध्ये थोडी अशी जागा -
जीवनाच्या वाटेवर दमलो कधी,
तुझ्या सोबतीने बसता येईल
पण ज्या छळतील आपल्याला अशा
आठवणींचा गाव नको देऊया,
असंच राहू दे ना आपलं नातं,
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया! !
प्रेमात नेहमी दुःखच असते.
मग कश्याला त्या दुखाच्या वाट्याला जाउया
प्रेम आहे न दोघात हे
आपल्या नजरेला कळू दे ना
असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success