।। कागद ।। Poem by Rajeev Deshpande

।। कागद ।।

कागद कागद कागदाची ताकद
जीवन प्रवासात सांगाती कागद
जन्मा येता दाखल्याचा कागद
नोकरीचा कागद चाकरीचा कागद
धंद्याचा कागद वांध्याचा कागद
अर्जाचा कागद कर्जाचा कागद
नगदीचा कागद उधारीचा कागद
कामाचा कागद दामाचा कागद
फायद्याचा कागद वायद्याचा कागद
वहीचा कागद सहीचा कागद
शेतीचा कागद जातीचा कागद
कागदी घोडे कचेरीतले कागद
जपलेले जीवापाड दुर्मीळ कागद
आज मथळा उद्या रद्दीचा कागद
आजन्म बाळगा पसाभर कागद
सापडतो शेवटी याच कागदात
आयुष्याच्या हिशोबाचा कागद
सोडता जग दाखल्याचा कागद
फिरून पुन्हा वारसाचा कागद
कागदाचा लगदा लगद्याचे खत
खतातून झाड झाडातून कागद!
~ राजीव नि. देशपांडे

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success