Tu Visarali Asashil....... Poem by mayur jadhav

Tu Visarali Asashil.......

तू विसरली असशील पण
पण तू माझ्या आठवणीत आहे
तू माझ्यावर प्रेम करत नसशील
पण माझे अजूनही तुझ्यावर प्रेम आहे

तू ते जुने दिवस विसरली
असशील पण मी नाही विसरलो
एवढेच काय तू मला विसरली
असशील पण मी तुला नाही विसरलो

आज ही तुझी कधी आठवण
आली का डोळयातून अश्रू येतात
आजही कधी तू स्वप्नात येतेस
तेव्हा झोपेतच चेहरयावर हसू येते

तुझ्यासोबत घालवलेले चांगले क्षण
मनास सुखद धक्का देऊन जातो
मात्र मन खिन्न होऊन जाते जेव्हा तू
सोडून गेलीस हा विचार येतो

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success