माझे आयुष्य Poem by Bhagyashree Gunjikar (Naik)

माझे आयुष्य

आयुष्य हे माझे काही विचित्र आहे
कधी माझे वडील तर कधी माझी आई डोके फिरवतच आहेत
कधी माझा भाऊ तर कधी आजूबाजूचे लोकं मला चुकीचं ठरवतच आहेत
आयुष्य हे माझे काही विचित्र आहे

वडलांची कर-कर डोक्यात कीडया सारखी फिरत आहे
कधी वाटते मला त्यांना वेड लागले आहे
आईचा तर ह्यात वाटा काही कमी नाही आहे पण काही असो ते माझे आई-वडिल आहे
आयुष्य हे माझे काही विचित्र आहे

भाऊ तर असून नसल्या सारखा आहे पण असला तर डोक्याला तापच आहे
राहीली आजूबाजूची लोकं ह्यांना तर दुसर्‍यांच्या आयुष्यात नाक खुपसायचे कामच आहे
आयुष्य हे माझे काही विचित्र आहे

आयुषाच्या ह्या टप्प्यावर काही मोठे करायचे वाटत आहे पण माझे आई-वडिल सारखे भांडत आहेत
दिली असती देवा तूने का जर ह्यांना बुद्धी तर लग्न नाही करायचा विचार आला नसता कधीच माझ्या मनी

का वाटते माझे जन्म कशा साठी झाले आहे?
एक मन बोलते की माझा जन्म आई वडिलांना ताट मानेने जगवण्यासाठी झाला आहे
तर दुसरे मन बोलते कि तूझे नशीबच फूटके आहे
पण ह्याचे उत्तर खूद्द देवाला ही का कळले आहे?
आयुष्य हे माझे काही विचित्र आहे

कीती जरी का हा विचार मी केला मनी आहे तरी मला माझे आई-वडिल आणि भाऊ खूप प्रिय आहेत
त्यांना पाहूनच ही कविता मी आज रचली आहे
आयुष्य हे माझे काही विचित्र आहे

Tuesday, October 20, 2015
Topic(s) of this poem: life,love and life,people
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success