// दाद // Poem by Rajeev Deshpande

// दाद //

केरव्याच्या ठेक्यावरती
थिरकते जीवनगाणे
दिवस होती घुंगरू
स्वर सुखदु: ख तराणे

करूनी प्रयत्न शर्तीचे
वाट यशाची पाहणे
वाहत येता सुयश
दिवस जुने आठवणे

पार पाडूनी कर्तव्ये
नित्य खुशीत रहाणे
आली संकटे लोटूनी
आनंद उधळीत जाणे

उधाण येता आनंदाला
भान हरपून जाणे
जीवन हेचि उत्सव
मैफिली केवळ बहाणे!

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success