तुटलेली नाती Poem by Mukesh Kumare

तुटलेली नाती

चार चौकतीट मन आम्ही रमवीले,
या सुंदर निसर्गाशी नाती आम्ही तोडीले,


लगोरीच्या चेंडू पेक्षा,
टीव्हीचा रिमोट हातात हवा,
खेळतांना भांडण्याचा,
विसरलोच आम्ही गोडवा;

विसरलोच आम्ही फ़ुलांचा सुगंध,
परफ्युम आणि ङिओच्या नादात,
तो मनमोहक गंध नाहीतर,
फक्त रसायन आमच्या श्वासात;

लोकांची खरी नावे काय हे,
लक्षातच नाही आमच्या,
कारण फेसबुक आणि व्हाट्सअपॅ वर टोपण नावे ठेवून,
आम्ही स्वता: च घालवली त्यातील मजा;

आता स्वप्नातही,
अप्सरा आणि भूतं येत नसतात,
कारण आजचं सोडून भविष्यात कसं जगायचं,
हाच एफ विचार सतत आमच्या डोक्यात;

सगळं आता घरपोच असतं,
सगळं त्यांनी निवळलेलं असतं,
पण बाजारात जाऊन स्वतः निवळायाची,
विसरलीच की हातं;

मोठमोठी इमारती आम्ही जरी उभारले,
स्वतःचा सोयी प्रमाणे जग आम्ही बनवीले,
सोयींमध्ये रमतांना मात्र,
या सुंदर निसर्गाशी नाती आम्ही तोडीले

-AEM KAY

Tuesday, July 11, 2017
Topic(s) of this poem: chaos,marathi,nature,peace,psychology
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success