निवड...? ? ? Poem by Shubh Salunkhe

निवड...? ? ?

दाराआड उभा मृत्यू आणि पलीकडे जीवन...

निवड करता येईल मला?

जवळची संधी पण इच्छेचीच मंदी...

अशानं जगता येईल मला?

जगण्यातली जिद्द पण मरणाने सुटका

नेमकं काय ते,

निवडता येईल मला?

अशाच त्रासांत रंगताना

शुन्य शुन्य आयुष्य जगताना

होईल का साकार सारे

आयुष्य माझे...!

असाच एकटा जगतो जीवन,

तुला तुलाच शोधतो आहे

तू फक्त एकदा मागे वळून बघ...

थांबलो आहे तुझ्याचसाठी...!

मागतो आहे आता फक्त...

तुझाच सहवास...

तुझाच सहवास...! ! !

- शुभम साळुंखे, धुळे

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success