प्रवास... Poem by Shubh Salunkhe

प्रवास...

(माझे वडिल श्री. सुरेश साळुंखे यांच्या शब्दांतून)

गर्दीत गुलाबांना अनुभवून आज गेलो

सावरीत पाकळ्यांना फुलपाखरू आज झालो

काट्यांच्या कुंपणातला जन्म माझा होता

झालेल्या जखमांना विसरुनी आज गेलो

चुकलो होतो अनेकवेळा वाटेवरती

सापडले ठिकाण आनंदाने वेडावून गेलो

शोध घेण्यास निघालो गर्दीत माझा मी

नजरेत माझ्या सावली बावरुन आज गेलो

अदृश्य झाले होते

माझे ते काटेरी घरटे

सावरीत असताना हसत

घरट्याशी आज गेलो

- श्री. सुरेश साळुंखे, धुळे

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success