देवा तूच आता सावर Poem by Omkar Jadhav

देवा तूच आता सावर

Rating: 5.0

जरा भरकटतोय या जगात,
जरासा आहे रागात,
आहे निष्ठा तुझ्यावर,
देवा तूच आता सावर...
देवा तूच आता सावर....

हरवल्या-हरवल्या सारख वाटतंय या आयुष्यात
रडतोय मी माझ्यात,
जगतोय मी तुझावर...
देवा तूच आता सावर....
देवा तूच आता सावर....

भरकटलेले मन शोधतोय मी तुझ्यात,
कारण तूच आहेस माझ्यात,
जरा कृपा कर माझ्यावर....
देवा तूच आता सावर....
देवा तूच आता सावर....

जीवाचा ताण वाढला आता,
नदीचा प्रवाह थांबला आता,
जोवर आहे तोवर...
देवा तूच आता सावर....
देवा तूच आता सावर....

संपले ते जीवन माझे,
आटले दे दिवस ताजे,
दुःख माझे तू आवर....
देवा तूच आता सावर....
देवा तूच आता सावर....

-ओमकार जाधव
9823717614
(लातूर)

Thursday, February 7, 2019
Topic(s) of this poem: prayer
COMMENTS OF THE POEM
Jazib Kamalvi 07 February 2019

Seems A good start with a nice poem, Omkar. Read my poem Love and L u s t. Thanks

0 0 Reply
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success