वाती Poem by Vinay Vaidya

वाती

अनंतकाळ तेवून असतात
काही दिव्यातील वाती
काही मात्र असतात
कधीच न पेटणाऱ्या.

काही वातीतेलांतल्या
काही साजूक तुपातल्या
काही तर चक्क असतात
मेणबत्तीच्या, अत्तरातल्या.

काही असतात उबदार
काही मात्र चटके बाज
काही साध्या मिणमिणणाऱ्या
काही लख्ख प्रकाशमान.

काही मात्र थिजलेल्या
काही कधीच जळलेल्या
काही विझून जाऊन सुद्धा
अजून तिथेच थिजलेल्या

काही जवळ असून ही
अनंतात पोचलेल्या
काही अनंतात जाऊनही
हृदयात तेवणाऱ्या.

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success