धन(Money-12th Std) Poem by Sameer Khasnis

धन(Money-12th Std)

मजपाशी जेव्हा होते बहुत धन, धन, हो!

बावरे होते मन, मन, हो!

परि तिळमात्रही नसें तो आनंद, जोवर झालो पुरता मी निर्धन हो!

मतलबी मित्र, प्रियजन देत मला रोज दर्शन हो!

तुतारी असावी एखाद्या लहानग्याच्या हाती हो!

पण ती त्याला कुणी वाजवू देईना हो!
कारण जवळच कुठे मयत झालीय हो!

त्या बिचाऱ्यागत माझी केविलवाणी अवस्था झाली होती हो!

माझ्या भावना मी बोलूनही दाखवू शकत नव्हतो हो!

खूप केले आयुष्यावर चिंतन, मनन हो!

निष्कांचन जे लोक असती सदा ते प्रसन्न हो!

आणि त्यांच्या बायकाही सदैव आनंदाने गुणगुणत असती मधमाश्यांसम हो!

हसतांना, खिदळतांना जेव्हा मी पाही या गरिबांना, मन होई आनंदी हो!

आणि पाही धनिकांच्या कपाळावर आठ्या हो!

मला वाटते, गरीब न जावे कधी एक थर वर, सोडून आपला स्तर हो!

आहे खरं तेच सांगतो, जिथं असे सदैव पैशांचा रतीब हो!

सधन यावे त्यांनी एक पाऊल अवश्य खाली हो!

मजपाशी जेव्हा होते बहुत धन, धन, हो!

बावरे होते मन, मन, हो!

होते कधी काळी अफाट मित्र जे कसोटीच्या क्षणी ठरलें संपूर्ण अपात्र हो!

आता आहेत अणुमात्र, पण सच्चे आहेत ते, अन मैत्रीस माझ्या एकदम पात्र हो!


मुळ कविता: MONEY
मुळ कवी: WILLIAM H.DAVIES

धन(Money-12th Std)
POET'S NOTES ABOUT THE POEM
The poem by William H. Davies is a part of the 12th std Maharashtra State Board syllabus. Though it is straightforward in its content yet I thought of getting it into Marathi for students across the state
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success