करु का तुझसी तुलना त्या उष्म प्रहरा संगे?
तु आहेस मनमोहीनी व
निर्मळ
झंझावाती वारे वाहुनी नेत असी उमलणाऱ्या कळ्या अधीचं त्या रंगे
अल्प हा उष्ण प्रहर, प्रसंगी दिव्यनेत्र तो दिनमणि पाहे सुरलोकी
असे जरी सुवर्णकाय गर्भ जे अविकल्प, तरी दडुन बसत असी दुर्लक्ष करून इहलोकी
जे असे सुरुप, काळ तर कधी विकार बदली निश्चित त्याचं स्वरूप
तु मनमोहिनी रुप तुझे शाश्वत, जैसे सुर्य चंद्र तमोहर
तुझसी काया अझर निर्मळ, ना कधी होईल नश्वर वा जर्जर
अमृत्यु आहेस तू, मुत्यु चे भय नसी तुजला,
जो कधीच न तुला बनवून शकेल आपला
माझे हे काव्य करील तुजला चिरनिरंतर भाव्य
धडगत राहतील जोवर जनांची स्पंदने, नेत्र पाहतील तोवर हे तुझं दिव्य रुप मनोहर
पद्य हे माझं, करील तुजला नेमस्त,
अथ सुर्योदय ते इती सुर्यास्त