नवी सुरूवात: The New Begining Poem by Yash Murade

नवी सुरूवात: The New Begining

वादळ संपले म्हणजे
समुद्र शांत होत नाही
अपयश नवी सुरवात आहे
शेवट नाही

ही रात्र आहे
अंधार नाही
तू जे केले
ते फार नाही

थोड्या वेळाने दिवस येणार आहे
धीर धर थोडा तुझ्याच प्रयत्नांनी
तुझे भविष्य सोनेरी
होणार आहे

अडचणीत तुला तुझीच
खंबीर साथ आहे
तूच तुझ्या भविष्याची
वात आहेस

रात्र होऊदे फार
पडुदे अंधार
अडचणी आधीही होत्या
आणि पुढे ही येणार

हो स्व्ययं प्रज्वलित
किती वेळ तू शांत राहणार आहे
नाही उठला आता तर
तू अशक्त च रहणार आहे

Saturday, January 14, 2023
Topic(s) of this poem: life,motivation,poem
POET'S NOTES ABOUT THE POEM
Its a poem written by me its about a end wich brigs a new beginning to life it help us to stay motivated, sorry to readers who cant read Marathi
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success