दृश्यांचा ढोबळ समुद्र Poem by Pradnya Daya Pawar

दृश्यांचा ढोबळ समुद्र

સ્ત્રી

ही चिडचिड असह्य
झोपेतल्या ग्लानीतही ओळखू यावेत
स्पर्श आवाज आकार
थांग हरवून बसलेला
हा दृश्यांचा ढोबळ समुद्र
डोळ्यांच्या झिलमिल पडद्यावर
याला कितीदा तरंगत ठेवू ?

आकस्मिक
अद्भुत
असाधारण
अपूर्व
गायब झालीय ‘अ'ची बाराखडी...

कबुल,
शाबूत ठेवावा लागतो
ढेर विश्वास
संकल्पनेवरचा, माणसांवरचा,
स्वतःवरचा सुद्धा,
पण मला एकदा तरी
अशी संहिता हवी आहे
जिथे सरकलेला असेल
केंद्रबिंदू फितरतीचा.

आहे का, आणखी एखादा दरवाजा ?
जिवंत मोकाट वाऱ्यासाठी
सताड उघडलेला !

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success