परिक्षेचा १ तास... Poem by Shubh Salunkhe

परिक्षेचा १ तास...

परिक्षेचा १ तास...

आयुष्यातील महत्वपूर्ण असा...

एखादा टर्निंग पॉइंट देणारा...

असतात बसलेले...

उत्तराची अपेक्षा

करत असलेले

काही चेहरे...

लिहिण्यात गुंतलेले

तर काही

विचारात दाटलेले...

बदलती मनीचे हावभाव

जणू काही रणसंग्रामच चालला आहे

जसे हिटलर येईल या भितीने

सारे 'ज्यु' आडोशास लपलेले...

कुठे होते वाक्यांची कत्तल तर

कुणी लिहितोय वा-याच्या वेगात

मी तर करतोय निरिक्षणे सारी

जणू वावरतोय आपल्याच जगात...

त्या एका तासाने शिकवलंय खुप काही मला...

उत्तरांशी झगडणे अन् ते शब्दांना बदडणे...

मी पाहतोय एक जेलर त्या गुरुजींमध्ये

पण उमगलंय आज की,

मीच माझ्यात एक हिटलर आहे...

वाक्यांचे हत्याकांड अन् उत्तरांना जखमी करणारा...

या एका तासातूनच घडणार आहे उद्याचे भविष्य...

पण तरीही जगतोय मी समाधानाने...

जसे समाधान राधेयाला त्यापरी मोठे,

मिळालेय मला...!

- शुभम साळुंखे, धुळे

COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success