वेड्याहुन वेडी माया Poem by Dr. Ravipal Bharshankar

वेड्याहुन वेडी माया

Rating: 5.0

वेड्याहून वेडी माया,
तुझीयावर केली राया.

अंगवळणी पडल्या सुरती,
विराणी गेली दूर ती.
आकाशी जडले घडले,
आताशी मी ही धरती.
रमनाच्या अवती भवती,
मिलनाची वेली व्हाया.

ओथंबुन अश्रु नाहल,
ओठही ते चिंब जाहल.
गालांच्या खळयांमधूनी,
प्रीतीचे स्मित वाहिले,
कव केले होते सव ते,
विळली होती मज काया.

पाहिले डोळा भरुनी,
जीवाला गोळा करुनी.
स्तवन स्त्रवले रे वदनी,
प्रवण मी आहे अजुनी.
पुनवे सम शितललेली,
अवसेची श्यामल छाया.

Sunday, September 7, 2014
Topic(s) of this poem: love
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success