सोड फुकात; झालं खिरुन,
कर सुटका तु आपली; कटकटीतून.
भुई थोडी; लोकं भारी; संख्येने,
शेळ्या मेंढरांवाणी; अकलेने.
देवधर्माचे व्यसन; जडलेले,
मर्तेमढे पदोपदी; अडलेले.
हया दुःखात; झालं मिरुन,
कर सुटका तु आपली; कटकटीतून.
शिक्षणाची गोडी नाही; कसलीही,
बाया माणसांची जात; नकलीही.
भुकेपरि बात यांची; बैमानं,
जानतेही झाले सारे; हैरानं.
चल सुखात; झालं हिरुन,
कर सुटका तु आपली; कटकटीतून.
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem