भूतांचा कर्दन काळ; तारुण्य वृद्ध आबाळ,
सूर्याहुन शुभ्र सकाळ; निरभ्र निळ आभाळ.
याहूनही जे जे म्हणूनी ते ते सारे कलले,
जीव घेणा माझ्या प्रेमा ज्ञाते सारे ढळले.
समयाची इवली डीवली; दिक्काली साउली शिवली,
तव गेले विषयां विषयी; विषयांची राखहि निवली.
याहूनही जे जे म्हणूनी ते ते सारे कलले,
जीव घेणा माझ्या प्रेमा ज्ञाते सारे ढळले.
हृदयाच्या अवती भवती; दिशयांनी केली किवली,
मनमानी उरी उदरी; अन पानी राखहि निवली.
याहूनही जे जे म्हणूनी ते ते सारे कलले,
जीव घेणा माझ्या प्रेमा ज्ञाते सारे ढळले.
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem