पर्जन्यवृष्टी Poem by Sameer Khasnis

पर्जन्यवृष्टी

नभात दाटून आला आहे भरगच्च पाऊस छटा जणू की गडद शाई.

सोंग करत लपण्याचं , सुप्त मनी ईहा घरुन करीत प्रार्थना अधिक पर्जन्यवृष्टी ची.

ध्वनी तो सलिलचा, ऐकू येतो मला जणू काही माझ्या नावाने उमटतो आहे प्रतिध्वनी.

सारेच स्तब्ध दृष्टीपात न पाहिलेल्या मुसळधार पावसामुळे.

वहीची पृष्ठे माझी चिंब भिजून पार दुमडून गेली, ज्यात मी नोंद करून ठेवल आहे:

' तपस्वी सताड उघडे मुख ठेवून बसलेत तास अनेक ग्रहण करत पर्जन्यवृष्टी.'

काळ्याशार पाण्यानं शिगोशीग भरलेलं गगनाचे वाडग, करील प्रक्षालन मुख तुमचं खळखळून.

पावत खिडक्या कंप ; तरल काचेला तडे पडु शकतात पर्जन्यवृष्टीत.

स्वयम् काळा कटोरा, वाट पाहत भरण्याची.

जर उघडलं तोंड मी, तर नक्की ही पर्जन्यवृष्टी बुडवले मला.

निघालो झपझप घराकडे जणू कोणी वाट पाहत आहे.

रात्रमान ऐसी जैसे तुमच्या त्वचेत ती समाविष्ट होऊ पाहत आहे.

आहे मी पर्जन्यवृष्टी.

पर्जन्यवृष्टी
This is a translation of the poem Rain by Kazim Ali
Saturday, July 29, 2023
POET'S NOTES ABOUT THE POEM
Rains are the most significant role in expressing human emotions. From happiness, love, despair and agony this season brings up the core of my art of expression. There is a subtle flow of eloquence and rhythm of nature
COMMENTS OF THE POEM
Close
Error Success