कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. साज शृंगारुनी साजणे... का तुझे हे लाजून हासणे.... धुक्या पहाटे जणू पाखरांचे किलबिलणे.... नखरे दार चंचल तू नार..... डोळ्यात उतरले भाव अपार..... नदीकाठी येना एकांती..... हरवू एकमेकांती..... जागू दे प्रीती.... हळुवार वाहते मखमली पाणी.... नजर शोधते तुजला राणी...... आम्र वृक्ष वेली छायेत...... ये ना सखे बाहू पाशात.... रानावनात मनाचीये अंगणात.... ठेवीन तुज हृदयी कोंदणात...... कवी: चैतन्य विनायक कन्हेरीकर. दिनांक: २३जुलै २०१३.
This poem has not been translated into any other language yet.
I would like to translate this poem