००० तू आली नाहीस म्हणून ००० Poem by Chaitanya Kanherikar

००० तू आली नाहीस म्हणून ०००

००० तू आली नाहीस म्हणून ०००

००द्वारा-चैतन्य कन्हेरीकर

० येते म्हणालीस, ठेंगा दाखवून
० आली नाहीस ना ३१डिसेंबरच्या पार्टीला? ००
००० वाट पाहून शिव्या शाप देवून
००० बंद होते मुंबई तडका म्हणून
००० तडक पोहोचलो राजकॉटेजला
००० तू आली नाहीस ना पार्टीला म्हणून ०१
० स्टार्टरला स्टार्ट मशरूम सुपानं
० प्रत्येक सीपकेला स्पायसी पेग
० अन ढोसला दारूच्या घुटक्या प्रमाणं
० तू आली नाहीस ना पार्टीला म्हणून ०२
००० मशरूम त्यातले खाल्ले दात ओठ चावून
००० केले दुर्लक्ष वेटरनी, तू ही न येऊन
००० मारला ताव खडीसाखरेवर चखना समजून
००० तू आली नाहीस ना पार्टीला म्हणून ०३
० मसाला पापडाचा चुराडा केला
० एक फटक्यात फाटले टेबल मधून
० सूप गेले त्यांतून आरपार झिरपून
० तू आली नाहीस ना पार्टीला म्हणून ०४
००० मसाला पापडाची भुकटी
००० तळ हाती, मिठाच्या चुन्यावर मळून
००० भरली मुस्कटात तंबाखू समजून
००० केलं दुर्लक्ष लोकांनी ही समजून उमजून
००० तू आली नाहीस ना पार्टीला म्हणून ०५
० मांडली होती डिश तुझी प्रेमानं
० उशिराका होईना येशील अगत्यानं हट्टानं
० मागवल्या हक्का नुडल्स प्रिय तुला म्हणून
० तू आली नाहीस ना पार्टीला म्हणून ०६
००० शेवयांची गांडूळे केली वेगळी
००० अन रचली तुझ्या डीश भौताली रांगोळी
००० त्यात गाजर बीट काकडीचे सलेद
००० भरले रंग म्हणून
००० तू आली नाहीस ना पार्टीला म्हणून ०७
० तुझ्या आवडीची काजुंची तीन रंगांची
० काजुराज स्पेशल भाजी
० मागवली होती आवर्जून
० काजू काढून कोंबले खिशात
० वाया जाऊ नयेत म्हणून
० तू आली नाहीस ना पार्टीला म्हणून ०८
००० रंगीबे रंगी भाजी थापली
००० बटर रोटी वर अन
००० मनोमनी ओवाळून टाकली तुझ्यावर
००० एका बाजूच्या मोठ्या कुत्र्याला
००० तू आली नाहीस ना पार्टीला म्हणून ०९
० त्याची ती रागावल्याने, तोही होता फुगून
० निजला होता रुसून शेपूट घालून
० निघून गेला तोही, नुसतेच हुंगून
० तू आली नाहीस ना पार्टीला म्हणून १०
००० वेज मोन्चुरीयन गोळ्यांच्या
००० पोटात खुपसले दात कोरणीचे भाले
००० केली पूजा हळद मसाला तिखट चोपडून
००० कोथिबिरीची फुले वाहून
००० चेटूक करून ठेवले नावानं तुझ्या
००० तू आली नाहीस ना पार्टीला म्हणून ११
० बडीशेप च्या अक्षतांनी केली
० उत्तर पूजा त्याची, आईस्क्रीम कोनाची
० भरली ओठांत चिरुट, खाली भोकं पडून
० घेतले भपकारे कॅडबरीचे भका भका
० जीव जाई तोपर्यंत गुदमरून
० तू आली नाहीस ना पार्टीला म्हणून १२
००० -चैतन्य कन्हेरीकर

०० कर्जत(रायगड) २६, नोव्हेंबर, २०१२

Wednesday, December 28, 2016
Topic(s) of this poem: madness
POET'S NOTES ABOUT THE POEM
सदर कवितेला वास्तवाची किनार आहे.
ती न आल्याने व्यथित झालेला तो, उद्विग्न
मनस्थितीत व्याकूळ आहे.त्याच्या कृतीतून
विरह००बिभत्स, करुण रसात, तसेच अतिशयोक्ती,
अलंकार पूर्ण विनोदात प्रगट झाला आहे.
कसा तो पहाना ०००
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success