तू आणि मी
तू आणि चंद्र
तू आणि वारा
तू
आणि हे तारे
कदाचित्
मातीच्या कोंडवाड्यात
सडणाऱ्या या
प्रेतांच्या
दुर्गंधीच्या सन्निध,
माझ्यासारखे अनेकजण
किंवा जे जळत रहातात
त्यांच्या आशाहीन आशेमध्ये
(वेदनांचा लेशही नाही, अर्थात्)
होय, मंद वाऱ्यातल्या होडीगत...