श्वासरुद्ध पर्वत Poem by mugdha karnik

श्वासरुद्ध पर्वत

एक प्रदीर्घ खोल श्वास
आणि मग पर्वत तिथेच उभा राहिला
मग इतरही पर्वत तिथे उभे राहिले
आणि अशा तऱ्हेने पर्वत उभे झाले आहेत तिथे

आणि खाली झुकतात
आणखी झुकतात
स्वतःतच झुकून
श्वास रोधून धरतात

जेव्हा आभाळ आणि समुद्र
गडगडतात आणि खळाळतात
पर्वत त्याचा श्वास रोधून ठेवतो.

This is a translation of the poem THE MOUNTAIN HOLDS ITS BREATH by Jon Fosse
Friday, October 6, 2023
POET'S NOTES ABOUT THE POEM
To the land of Ibsen and Fosse
COMMENTS OF THE POEM
Close
Error Success