००सणांची मांदियाळी ००० Poem by Chaitanya Kanherikar

००सणांची मांदियाळी ०००

००सणांची मांदियाळी ०००
००
००द्वरा: चैतन्य कन्हेरीकर
००
००मांदियाळी सणांची ००
००घेऊनि आला चातुर्मास ००
००आनंदा उधाण ००
००कहाण्यांचा सुकाळ ००
००व्रतं वैकल्ये उपास ००
००
००नागपंचमीला ००
००पुजा नागोबाला ००
००लाह्या दुध फुले००
००नैवेद्याला ००
००
००रक्षाबंधनि बंध ००
००नाजूक धाग्यांचे ००
००भावा बहिणीच्या ००
००अतूट मायेच्या प्रेमाचे ००
००
००गोकुळात घरोघरी हले ००
००कृष्ण जन्माचा पाळणा ००
००दहीहंडी चा जल्लोष ००
करी गोपाळ दिवाणा ००
००
००आली दिव्यांची आवसं ००
००पवित्र ज्योती तेवतातं ००
००दुरितांचे तिमिरं जाळीत ००
००दाही दिशा उजळतं ००
००
००झुलं पाठीवर माळा फुले ००
००बाशिंगे रंगून बैल सजविले ००
००घासं पुरणपोळीचे त्यासी भरविले ००
००साजिरे बैलपोळे गावभरं मिरविले ००
००
००उपवासं व्रत करोनी ००
००मनोभावे देवीला पुजति ००
००मंगल पुजा मंगळवारी राति ००
००मंगळागौरी जागविती ००
००
००सखि पार्वती पूजनां ००
००स्थापितां शिवं हरितालीकांना ००
००मनासारिखा लाभे साजणा ००
००सख्या भाविकांना ००
००
००पार्थिवं गणेश चतुर्थी गजाननं ००
००गणं करिती गणेश पूजनं ००
००गणरायाचे आगमनं ००
००प्राणंप्रतिष्ठा मंगल गानं ००
००
००आली भेटीला माऊली गौरी००
००जेष्ठा कनिष्ठा पूजोनि कुणी ००
००आवाहन सौभाग्याचे करी ००
००माहेर वाशिणि ००
००
००अनंत चतुर्दशीला ००
००सांगता सोहळ्याची ००
००प्रार्थना गणरायाला ००
००सुख शांती समृद्धी नांदण्याची ००
००
- चैतन्य कन्हेरीकर ऑगस्ट२००७

Wednesday, February 15, 2017
Topic(s) of this poem: celebration
POET'S NOTES ABOUT THE POEM
*काही महत्वाच्या सणांचे वर्णन
सदर काव्यात केले आहे.
COMMENTS OF THE POEM
READ THIS POEM IN OTHER LANGUAGES
Close
Error Success